सूर्यास्त
सायंकाळी एक व्यक्ती
आयुष्यात हार मानून चालली
पण पाहुनी ते डुबते सूर्यबिंब
नदीकाठी उभी राहिली .
घेरलेले ते गगन सारे
रक्तरंगी नाहले
अवचित त्या पाणलहरीत
त्याने रविबिंब पाहिले .
अस्त होणार भास्कराचा
साऱ्या सृष्टीला चाहूल लागली
होता संथ झोत प्रकाशाचा
पक्षिणी घराकडे धावली .
संथ झाले चित्त त्या व्यक्तीचे
दिनकाराचा अस्त जाहला
इच्छा इर्षा अन महत्वाकांशाचा
जोरही सोबत मावळला .
परतताना त्या व्यक्तीने
मागे वळूनी पाहिले
पण पाहुनी अंधःकार मागे
त्याने पुढचे पाउल टाकले .
सायंकाळी एक व्यक्ती
आयुष्यात हार मानून चालली
पण पाहुनी ते डुबते सूर्यबिंब
नदीकाठी उभी राहिली .
घेरलेले ते गगन सारे
रक्तरंगी नाहले
अवचित त्या पाणलहरीत
त्याने रविबिंब पाहिले .
अस्त होणार भास्कराचा
साऱ्या सृष्टीला चाहूल लागली
होता संथ झोत प्रकाशाचा
पक्षिणी घराकडे धावली .
संथ झाले चित्त त्या व्यक्तीचे
दिनकाराचा अस्त जाहला
इच्छा इर्षा अन महत्वाकांशाचा
जोरही सोबत मावळला .
परतताना त्या व्यक्तीने
मागे वळूनी पाहिले
पण पाहुनी अंधःकार मागे
त्याने पुढचे पाउल टाकले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा