एक अश्रू
एक अश्रू असतो
जो घरंगळतो डोळ्यातून
चमकतो मोत्याप्रमाणे
पण पडतो थेंब बनून .
एक अश्रू काय मोलाचा असतो
कधी कवडीमोल तर कधी अनमोल असतो
एक अश्रू कसा असतो
जो घरंगळतो सुखात अन दुःखातही
कधी असतात अश्रूंच्या वाहत्या धारा'
तर कधी अनमोल मोत्यांच्या माळा
पण अश्रू कधीतरी आटतो
मनात वेदना बनून साठतो
एक अश्रू असा असतो……………
एक अश्रू असतो
जो घरंगळतो डोळ्यातून
चमकतो मोत्याप्रमाणे
पण पडतो थेंब बनून .
एक अश्रू काय मोलाचा असतो
कधी कवडीमोल तर कधी अनमोल असतो
एक अश्रू कसा असतो
जो घरंगळतो सुखात अन दुःखातही
कधी असतात अश्रूंच्या वाहत्या धारा'
तर कधी अनमोल मोत्यांच्या माळा
पण अश्रू कधीतरी आटतो
मनात वेदना बनून साठतो
एक अश्रू असा असतो……………
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा